महिला दिन आणि “स्त्री अस्तित्वाचा प्रश्न”



आज महिला दिन साजरा करतो,
स्त्रीसाठी न्याय मागतो,
पण कित्येक स्त्रिया अजूनही झुंजतात,
अन्यायाच्या छायेतच जगतात.

कधी हुंड्यासाठी बळी पडतात,
कधी घरच्यांच्या हातूनच जळतात,
कधी बलात्कार, कधी छळाचा सामना,
तरीही समाज तिलाच दोष देतो पुन्हा-पुन्हा...

सासू-सुना, जावा-जावा, नणंद भावजय
एकीकडे वेगळाच खेळ मांडतात,
परंपरेपासून मिळालेली अवहेलना 
चित्रपट आणि मालिका च्या माध्यमातून घरोघरी रंगतात... 

पण काही स्त्रिया कायद्याचा गैरफायदा घेतात,
खोट्या खटल्यात पुरुषांना जखडतात,
498A च्या जाळ्यात अडकवतात,
सत्य-असत्याचा खेळ मांडतात.

एका बाजूला मुलींवर अन्याय होतो,
बालविवाह, बलात्कारानं विकृत समाज पांगतो,
तर दुसरीकडे हनीट्रॅप, खंडणीचे खेळ,
इमोशनल ब्लॅकमेल चा डाव रंगतो...

खर्‍या संघर्ष करणाऱ्या स्त्रिया कुठे जातात?
त्या न्यायाच्या दारातच उपाशी बसतात,
एका स्त्रीच्या चुकीमुळे साऱ्या दोषी ठरतात,
आणि जेव्हा गरज असते, तेव्हा त्या न्यायापासून लांब राहतात.

न्याय हवा! पण तो समतेने लागू पडावा,
खोट्या आरोपांनी कोणाचा घात होऊ नये,
जेथे खरेच अन्याय होतो, तिथे तो लढला जावा,
स्त्रीत्वाच्या सन्मानाचा "कणा" कधी मोडला जाऊ नये...

महिला दिन हा फक्त घोषणांचा नसेल,
तो खऱ्या न्यायासाठी लढण्याचा असेल,
ना कोणी पीडित राहील, ना कोणी खोटं खेळेल,
तेव्हाच खरा “महिला दिन” विश्वात शोभेल!...

✍ अॅड. विशाल गाडे. 
मो. क्र. ९९८७११२०५६ 

Comments

Popular posts from this blog

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या नावे मालमत्तेचे अधिकार, भाग प्रमाणपत्र (Share Certificate) हस्तांतर आणि त्याचा कायदेशीर परिणाम.

Remedies When One Legal Heir Refuses to Vacate or Sell the Inherited Property: Legal Position under Indian Civil Law

जेव्हा सोसायटी कमिटी नियम मोडते: तेव्हा तुमचे कायदेशीर हक्क काय आहेत?